समाजात वावरतांना भूमिका माहित असणे गरजेचे

0

प्रा.डॉ.अनंत कापडी ; भुसावळात राष्ट्रीय रसायनशास्त्र परीषद

भुसावळ : अध्यापनापलिकडे समाजात वावरतांना आपली भूमिका काय असावी हे निश्‍चित असणे गरजेचे आहे. तसे असले तरच विज्ञान, माणूस व भविष्यातील विकास यांची सांगड घालणे शक्य आहे, असे विचार मुंबईच्या माटुंगा इन्स्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे शास्त्रज्ञ प्रा.डॉ.अनंत कापडी यांनी येथे व्यक्त केले. शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात उमवि, जळगाव व रसायनशास्त्र विभागाच्या विद्यमाने 5 रोजी एक दिवसीय ‘रिसेंट ट्रेंडस् इन केमेस्ट्री अ‍ॅण्ड एन्व्हायरमेंट 2017’ या मल्टी डीसीप्लेनरी राष्ट्रीय परीषदेचे मंगळवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रा.डॉ.ए.आर.कापडी म्हणाले की, संशोधक विद्यार्थ्यांना मुंबईच्या इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीकडून सर्व प्रकारची मदत दिली जाईल. शिक्षक व संशोधक या व्यक्तिरेखांमधून सुरू असलेला जीवनाचा प्रवास त्यांनी मांडला. देशभरातील संशोधक व प्राध्यापक उपस्थित होते.

शोधनिबंधाचे सादरीकरण
परीषदेच्या दुसर्‍या सत्रात देशभरातून आलेल्या 15 प्राध्यापकांनी आपले ओरल स्वरूपात तर 45 प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी पोस्टर स्वरूपात शोधनिबंध सादर केले. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एस.राजपूत होते. प्रा.डॉ.एम.के.पटेल, रावेरचे प्रा.अविनाश सोनार आदींची उपस्थिती होती. प्राचार्य राजपूत यांनी मनोगतातत उत्कृष्ट आयोजन केल्याने महाविद्यालयाचे कौतुक केले.

विज्ञानाचा अभ्यास मेडिटेशनपेक्षाही उपयुक्त
प्रमुख अतिथी व जळगावच्या उमविचे प्रा.डॉ.के.जे.पाटील मनोगतात म्हणाले की, रसायनशास्त्राच्या विविध शाखांचा मानवी समाजाचा विकासासाठी उपयोग होणे गरजेचे आहे. विज्ञानाचा तंत्रशुध्द अभ्यास हा मेडिटेशनपेक्षाही उपयुक्त आहे.

यांची प्रमुख उपस्थिती
रसायनशास्त्र परीषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर.पी.फालक, परीषद प्रमुख डॉ.जी.पी.वाघुळदे, भालोद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.एस.कोल्हे उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.माधुरी पाटील व प्रा.अंजली पाटील तर आभार प्रा.डॉ.आर.बी.ढाके यांनी मानले.

देशभरातील 130 प्राध्यापक व संशोधकांचा सहभाग
राष्ट्रीय परीषदेत देशभरातील 130 प्राध्यापक व संशोधकांनी सहभाग नोंदवला. प्राध्यापकांनी सादर केलेल्या दोन शोध निबंधांना ‘बेस्ट रिसर्च अ‍ॅवॉर्ड’ देवून गौरवण्यात आले. पोष्टर प्रेझेंटेशनसाठी भालोद महाविद्यालयाचे प्रा.राकेश चौधरी, फैजपूरच्या प्रा.पल्लवी भंगाळे तर ओरल प्रेझेंटेशनसाठी शहादा महाविद्यालयाचे प्रा.मिलींद पाटील तसेच भोळे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.दयाधन राणे यांना प्रा.डॉ.अनंत कापडी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
परीषदप्रमुख प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, समन्वयक प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.आर.एम.सरोदे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.भारती बेंडाळे, प्रा.डॉ.कांती भाला, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.शोभा चौधरी, प्रा.डॉ.संजय धर्मा चौधरी, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.ए.आर.सावळे, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.ए.जी.नेमाडे, प्रा.एस.एल.पाटील, प्रा.डॉ.आर.डी.भोळे आदींनी परीश्रम घेतले.