भुसावळात मातृभूमी मंडळातर्फे रावण दहन ; वारंवार तोंड काढणार्या रावणाचा नागरीकांच्या सहकार्याने वध करणार -आमदार संजय सावकारे
भुसावळ- दृष्ट प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी रावणाचे दहन केले जाते मात्र समाजात असे अनेक रावण आहेत, जे रावण वारंवार जन्माला येत असतात व त्या रावणांचे दहन करणे हे आपले काम आहे, असे स्पष्ट मत माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. ते म्हणाल ेकी, विजयादशमीच्या दिवशी सोनं लुटले जाते तसा आनंदही लुटला जातो. भुसावळ शहरात नवीन विकासाचे पर्व सुरू झाले असून शहरवासीयांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. शहरातील जय मातृभूमी मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे टीव्ही टॉवर मैदानावर विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर खडसे यांच्या हस्ते रावणाचे दहन करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कुंभकर्णाच्या पुतळ्याचे आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते तर मेघनाथाच्या पुतळ्याचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या हस्ते दहन करण्यात आले. कार्यक्रमानंतर सुमारे दिड तास आकर्षक फटाक्यांची रोशनाई करण्यात आली.
दृष्ट प्रवृत्तींना मतदारांनी जागा दाखवली -आमदार संजय सावकारे
आमदार संजय सावकारे म्हणाले की, सर्व नागरीकांच्या सहकार्याने रावणाचे आम्ही यापूर्वीच दहन केले आहे मात्र तो रावण पुन्हा-पुन्हा तोंड काढण्याचे प्रयत्न करतो मात्र वेळोवेळी नागरीकांच्या सहकार्याने त्याला ठेचण्याचे काम केले जाईल. कुणाचेही नाव न घेता ते म्हणाले की, भुसावळ शहरातील जनतेने विधानसभा, नगरपरीषद व अन्य निवडणुकांमध्ये दृष्ट प्रवृत्तीला त्यांची जागा दाखवून दिली आहे. कुठे बाण मारला तर रावणाचा वध होईल हे नाथाभाऊंना माहित आहे म्हणूनच आम्ही त्यांच्या हस्ते रावणाचे दहन करतो, असेही त्यांनी सांगितले.
शहरात विकासपर्व -नगराध्यक्ष रमण भोळे
नगराध्यक्ष रमण भोळे म्हणाले की, वाईट व भ्रष्ट प्रवृत्तीमुळे शहराचा विकास खोळंबला होता मात्र नगराध्यक्ष झाल्यापासून वरीष्ठ नेते, प्रशासकीय अधिकारी व जनतेची सात मिळत असल्याने कामांना गती मिळाली आहे. शहरातील जनतेने कुणालाही घाबरु नये, असे आवाहन त्यांनी करीत आता शहरात विकासपर्व सुरू झाल्याचे ते म्हणाले. शहरातील विकासकामांची त्यांनी माहिती दिली.
यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, मनोज बियाणी, माजी आमदार नीळकंठ फालक, दिलीप भोळे, डीवायएसपी गजानन राठोड, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार, गटनेता मुन्ना तेली, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, प्रमोद नेमाडे, किरण कोलते, युवराज लोणारी, राजेंद्र नाटकर, पुरूषोत्तम नारखेडे, महेंद्रसिंग ठाकूर, पिंटू कोठारी, रमेश नागराणी, भारती रमण भोळे, रजनी संजय सावकारे, संगीता बियाणी, अॅड.निर्मल दायमा, गिरीश महाजन, दीपक धांडे, बापू महाजन, सतीश सपकाळे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक किरण कोलते, सूत्रसंचालन शांताराम पाटील व शर्मा सर तर आभार अॅड.निर्मल दायमा यांनी मानले.