शिंदखेडा। परिवार सुखी असेल तर समाज सुखी होईल व समाज सुखी झाला तरच देश सुखी होऊ शकतो असे प्रतिपादन भारतीय जैन संघटनेचे धुळे संपर्क प्रमुख दिपक चोपडा यांनी केले. ते शिंदखेडा येथील जैन स्थानकात भारती जैन संघटनेच्या आयोजित बैठकित बोलत होते. चोपडा हे दोन दिवशीय संपर्क दौर्यांवर जिल्ह्यात आलेले आहेत. चोपडा यांनी भारतीय जैन संघटना भारतात करत असलेल्या कामांची माहिती दिली.
संघटनेतर्फे महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या 825 मुलांची शैक्षणिक व निवासीची व्यवस्था, पालकत्व स्विकारले असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात दुष्काळ निवारण्यसाठी 2 हजार गावां पोकलैंड व जेसीबी मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच संघटना आपत्ती व्यवस्थापनात तसेच शैक्षणिक प्रकल्पात व सामाजिक बांधीलकीतून युवती सक्षमीकरण, युवक सक्षमीकरण, व्यवसायात अधुनिकता कशी आणावी आदी विषयांवर सातत्याने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीचे अध्यक्ष जैन संघाचे संघपती खुशालचंद ओस्वाल होते. प्रमुख अतिथीम्हणून जयप्रकाश आंचलिए, प्रा. सी. डी. डागा आदी उपस्थित होते. यावेळी शिंदखेडाच्या अध्यक्षपदी निखील रूपवाल व सचिवपदी सचिन गुजराथी यांची निवड जाहीर केली. प्रास्तविक व सूत्रसंचालन संजय पारख यांनी केले. याप्रसंगी अशोक राखेचा, सुमित, अक्षय बाफना, आयुष कर्नावर, राजमल बोथरा, कल्पेश जैन आदी उपस्थित होते.