समीर पिंजारीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

0
पाच वर्ष 10 महिने चाललेल्या झुंजीचा अखेर
भुसावळ : माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांचे पूत्र समीर पिंजारी (24) यांची रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जळगावच्या आर्किड रुग्णालयात प्राणज्योत मालवली होती. दुसर्‍या दिवशी सोमवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शहरातील मुस्लीम कब्रस्थानात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भुसावळातील वादग्रस्त बांधकाम व्यावसायिक सानिया कादरीने 5 जानेवारी 2012 रोजी केलेल्या गोळीबारात समीर जखमी झाले होते. तब्बल पाच वर्ष 10 महिने सुरू असलेली मृत्यूची झुंज अखेर रविवारी थांबली.