मुंबई : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नंतर दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांना अखेर रोख ५ लाख रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. याप्रकरणात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ज्या मुद्द्यावर जामिन मंजूर केला त्यानुसार समीर भुजबळ यांना जामिन मंजूर करण्यात आल्याचे न्या। अजय गडकरी यांनी स्पष्ट केले.
हे देखील वाचा
भुजबळ यांना मुंबईच्या हद्दीच्या बाहेर जाण्याबाबतची अट होती समीर भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या हद्दीच्या बाहेर म्हणजे (महाराष्ट्र गोवा) जाऊ नये अशी अट टाकण्यात आली आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाने पीएमएलए कायद्यातील कलम ४५( १) रद्द केले आहे. त्याचा आधार घेत आतापर्यंत छगन भुजबळ यांच्यासह सुमारे ५२ जणांना जामिन मंजूर झाला आहे त्यामुळे समीर भुजबळ यांना जामिन मंजूर करावा असा युक्तिवाद समीर भुजबळ यांच्यावतीने विक्रम चौधरी यांनी केला. या आधारावर उच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला या जामीनाला ईडीची बाजू मांडणारे सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी जोरदार विरोध केला.