सरकाटे स्मृति प्रतिष्ठान यंदाही करणार साहित्यिकांचा सन्मान

0

भुसावळ- शहरातील कवयित्री शेवंताबाई निनाजी सरकाटे स्मृती प्रतिष्ठानतर्फे यंदाही कथा, गजल, काव्य, कादंबरी या कलाप्रकारांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. लेखकांचा सन्मान या उपक्रमातून केला जाणार आहे. साहित्य सरीतेचा प्रवाह अखंडित राहावा या उद्देशाने प्रतिष्ठानने हा उपक्रम हाती घेतला आहे. जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 या कालावधीत प्रकाशित साहित्यकृतींची निवड या पुरस्कारांसाठी केली जाणार आहे. प्रकाशित साहित्याच्या दोन प्रती, स्वपरिचय, दोन पासपोर्ट साइजचे फोटो3 30 जुलैपर्यंत रमेश निनाजी सरकाटे, 2 स्वामिनी अपार्टमेंट, शारदानगर, भुसावळ या पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कारासाठी आलेल्या साहित्याची निवड करण्यासाठी लवकरच एक समिती गठीत करण्यात येणार आहे. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शाल श्रीफळ, प्रशस्तिपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. पुरस्कारांची घोषणा 20 ऑगस्टला होईल तर वितरण 7 सप्टेंबरला होणार आहे.