सरकारची कर्जमाफीची आकडेवारी शेतकर्‍यांना फसवणारी

0

नवापूर । सरकारची कर्जमाफीची आकडेवारी शेतकर्‍यांना फसवणारी असल्याचे बळीराजा महासंघ कोकण विभागाचे अध्यक्ष अंकुश देशमुख यांनी सांगितले. ते सत्यशोधक शेतकरी सभेच्यावतीने आयोजित हुतात्मा अभिवादन सभेत बोलत होते. याप्रसंगी सत्यशोधक शेतकरी सभेचे अध्यक्ष रामसिंग गावीत, कालीदास आपटे , शेतकरी सुकाणु समितीच्या सदस्या सुशिला मोराळे (बीड), कॉ.रामा गावीत,कॉ.रामसिंग गावीत,कॉ.साजुबाई गावीत,कॉ.जगन गावीत आदी उपस्थित होते. यावेळी राज्य सुकाणु समितीने पुकारलेल्या शेतकरी एल्गार सभेत आंदोलन अधिक तीव्र करणाचा इशारा देण्यात आला.

कर्जमाफीच्या आकडेवरीत फसवणूक
सत्यशोधक शेतकरी सभेचे संघटक तसेच सुकाणु समितीचे सदस्य कॉ.किशोर ढमाले यांनी निवडणुकीच्या काळात मोदींनी शेतकर्‍यांना स्वामीनाथन आयोग लागु करु म्हणुन सांगितले. परंतु, दिलेले आश्‍वासन पाळले नाही. फडणवीस सरकारने कर्जमाफीचे आकडेवारीत फसवणुक केली आहे. सरकारने उदयोग, भांडवलदार आदींबाबत कायदे केले परंतु, ते सर्व शेतकरी धोरणांच्या विरोधात आहेत. राज्य सरकारचे कर्जमाफीची आकडेवारी नीटपणे जाहीर केली नाही.

शेतकरीविरोधी धोरण
महात्मा-फुले रचित सत्याचा अखंड सामुहिकरित्या गायन करून वीर पुरुष म.फुले, सावित्रीबाई फुले ,खाजेसिंग नाईक ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सत्यशोधक शेतकरी सभेचे अध्यक्ष रामसिंग गावीत यांच्या नेतृत्वाखाली सभेला सुरुवात झाली. सुकाणु समितीचे कालीदास आपटे यांनी केंद्रामधील मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे फडवणीस सरकारने शेतकरी विरोधी धोरण,शेतकरी आत्महत्या,स्वामिनाथन आयोग इत्यादी मागण्या संदर्भात मार्गदर्शन केले.

सुकाणु समितीच्या प्रमुख मागण्या
स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी नुसार सरसकट कर्ज मुक्ती आदिवासी वनहक्क कायद्याची अंमलबजावणी इ.विविध विषयावर मार्गदर्शन केले.सत्यशोधक शेतकरी सभेचे कार्यकर्ते कॉ.रामा गावीत,कॉ.रामसिंग गावीत,कॉ.साजुबाई गावीत,कॉ.जगन गावीत,यांनू मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाचे सुञसंचलन रंजित गावीत यांनी केले.