मुंबई-भाजप-सेना युतीचे सरकार राज्यात सर्वच आघाडीवर अपयशी ठरले आहे. सत्तेत असूनही शिवसेना भाजपवर सातत्याने टीका करीत असते मात्र सरकारमध्ये शिवसेना भागीदार असल्याने सरकारच्या सर्व अपयशात शिवसेना देखील वाटेकरी असल्याचे आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले आहे. ट्वीटरवरून त्यांनी आरोप केले आहे.
सरकारच्या सर्व अपयशांमध्ये शिवसेनेचाही तेवढाच वाटा आहे. सत्तेत तुम्हीही वाटेकरी आहात, मग कर्जमाफीतला भ्रष्टाचार का उघडकीस आणला नाही? ४ वर्ष सत्तेत असताना राम मंदिर बांधण्यापासून कोणी रोखलं होतं? https://t.co/vvIum3GuYX
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2018
कर्जमाफी हा या सरकारचा सर्वात मोठा घोटाळा असून शिवसेनेने तो उघडकीस का नाही आणला? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. सत्तेत येण्यापूर्वी राम मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत येऊन चार वर्षे उलटली, मात्र अद्यापही राम मंदिर बांधण्यात आलेले नाही. कोणी रोखले होते राम मंदिर बांधण्यापासून असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.