नाशिक-कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी मंत्र्यांना कांदा फेकून मारावा असा सल्ला देखील राज ठाकरे यांनी दिला होता. दरम्यान ते आज नाशिक होते. यावेळी त्यांनी जाहीर सभेत शेतकऱ्यांनी मंत्र्यांना कांदा फेकून मारा, आणि असे मकी मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे असे सांगितले. माझ्या भाषणाची दखल घेत सरकारने कांद्याला दोनशे रुपये प्रती क्विंटल दर जाहीर केले आहे. परंतू हे दर मला मान्य नाही असे राज ठाकरे यांनी सांगितले.
पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील राज ठाकरे यांनी यावेळी दिला.