शिर्डी-राज्याची आर्थिक स्थिती सध्या खूपच डबघाईला गेलेली दिसते आहे. राज्य सरकारवर कर्जाचा डोंगर उभा आहे. सरकारवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. त्यावर शिर्डी देवस्थान संस्थान ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला आहे. शिर्डीच्या ट्रस्टने ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज सरकारला देऊ केल्याचे वृत्त एका दैनिकाने प्रसिद्ध केले आहे.
निळवंडे येथील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी ही मदत देण्यात आल्याचे या वृत्तात म्हटले आहे. या योजनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. शिर्डी देवस्थान ट्र्स्टचे अध्यक्ष आणि भाजपा नेते सुरेश हावरे यांनी राज्य सरकारला सिंचन योजनेसाठी कर्ज मागितल्यानंतर परवानगी दिली आहे.