मुंबई-राज्य सरकारच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेत मोठी चूक झाली आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उल्लेख दिनदर्शिकेत करण्यात आलेला नाही. सरकारच्या माहिती व जनसंपर्क विभागाची ही मोठी घोडचूक असून त्यामुळे सरकारला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
२८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले यांची पुण्यतिथी तर ६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरीनिर्वाण दिन असते. त्याचा उल्लेख शासनाकडून छापण्यात आलेल्या दिनदर्शिकेत करण्यात आलेला नाही.
दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावरून सरकारवर निशाना साधला आहे. या सरकारकडून महापुरुषांचा वारंवार अपमान होत असल्याचे पुन्हा उघड झाले आहे. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि शिक्षणाचे पुरस्कर्ते महात्मा फुले यांचाच विसर सरकारला पडला आहे अशी टीका त्यांनी केली आहे.
यावर सरकारने स्पष्टीकरण दिले असून दिनदर्शिकेत फक्त जयंतीचा उल्लेख करण्याचा निर्णय झाला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.