A person in Jalgaon was cheated of four and a half lakhs by the lure of a government job जळगाव : शासकीय नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत एकाची चार लाख 40 हजारात फसवणूक करण्यात आली.
आमिष दाखवत केली फसवणूक
प्रदीप चिंतामण ससाणे (52, रा.गोकुळ नगर, जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. प्रदीप ससाणे हे खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. प्रदीप ससाणे यांचे भाचा व मुले हे चांगले उच्च शिक्षीत असल्याने त्यांच्यासाठी नोकरीची शोधाशोध सुरू केली. शासकीय नोकरीत लावून देण्याची माहिती भुषण शरद पाटील (रा. खाजोळा, ता.पाचोरा) यांनी माहिती दिली. आपली आरोग्य सेवक, रेल्वे, म्हाडा, वाहन चालक, रेल्वे गृप डी अशाा विभागामध्ये आपली चांगली ओळख असल्याचे भासवत सरकारी नोकरी लावून देण्याचे भासवत संशयित आरोपी भुषण पाटील याने प्रदीप ससाणे यांच्याकडे पैश्यांची मागणी केली. त्यानुसार ससाणे यांनी वेळोवेळी अस एकुण 4 लाख 40 लाख रूपये अदा करण्यात आले.
अखेर पोलिसात गुन्हा
मुलांना नोकरीची कोणतीही आर्डर न देता फसवणूक केल्याचे लक्षात आले. प्रदीप ससाणे यांनी तातडीने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने आरोपी भूषण शरद पाटील (खाजोळा, ता.पाचोरा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.