सरकार आणि प्रत्येकाने वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजेत:पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली: ‘चार वर्षांपासून सुरू झालेल्या स्वच्छतेच्या मोहिमेला देशातील प्रत्येक स्तरातील लोकांचा पाठिंबा मिळाला आहे. प्रत्येकाने या मोहिमेत भाग घेतला असून आतापर्यंत ४५० जिल्हे हागणदरीमुक्त झाले आहेत. गेल्या ६०-७० वर्षात जे झालं नाही, ते गेल्या चार वर्षात करून दाखवलं’, असं सांगतानाच ‘केवळ शौचालये बनवल्याने भारत स्वच्छ होणार नाही, तर स्वच्छता ही सवय झाली पाहिजे’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

‘स्वच्छता हीच सेवा’ या मोहिमेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी सर्वसामान्य जनतेसह बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी अध्यात्मिक गुरु जग्गी वासूदेव यांच्याशीही संवाद साधला. केवळ माझ्या संकल्पनेनुसार सरकार स्वच्छता मोहिमेवर काम करत असेल तर तेवढं पुरेसं नाही. त्यासाठी सरकार आणि प्रत्येकाने वैयक्तिक प्रयत्न केले पाहिजेत, असं मोदी म्हणाले.