सरकार पुरावा सादर करून शकले नाही तर ही कारवाई घटनाविरोधी ठरेल

0

नवी दिल्ली- पुणे पोलिसांनी देशभरात माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयाने छापेमारी करत ५ जणांना अटक केली आहे. संपूर्ण देशभरात या घटनेने खळबळ माजली आहे. दरम्यान सरकारकडून ही कारवाई पुराव्याच्या आधारे केली जात असल्याचा दावा केला जात आहे. मात्र जर पुरावे सापडले नाही तर सरकारची ही कारवाई लोकशाही आणि घटनाविरोधी ठरेल असे जेडीयू नेते पवन वर्मा यांनी सांगितले आहे.

देशभरात माओवादी कार्यकर्त्यांविरोधात धाडसत्र सुरु आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा माओवाद्यांशी संबंध असल्याने काहींना अटक करण्यात आली होती.