ग्रामपंचायत निवडणूक ; 90 इच्छूक निवडणुकीच्या मैदानात
भुसावळ– तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर पिंप्रीसेकम-निंभोरा गृप ग्राम पंचायतीची पोट निवडणुकीत अर्ज माघारच्या अखेरच्या दिवशी सरपंच पदासाठी पाच तर सदस्य पदाच्या 18 इच्छुकांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात 12 इच्छूक सरपंचपदासाठी तर 90 इच्छूक भवितव्य आजमावत आहेत. सदस्य पदासाठी 117 तर सरपंचपदासाठी 17 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
ग्रामपंचायतनिहाय माघार घेतले सदस्य असे-
शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी ग्रामपंचायत निहाय माघार घेतलेल्या सदस्यांची संख्या अशी गोजोरे येथे एकाही सदस्यांनी माघार न घेतल्याने सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 12 इच्छूक निवडणूक रिंगणात आहेत. दोन सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चोरवड येथे सरपंचपदाच्या शर्यतीतून दोन तर सदस्यपदासाठी सात जणांनी माघार घेतली. तेथे तीन सदस्य बिनविरोध निवड झाली. तसेच वराडसीम येथे सरपंचपदाच्या एक तर सदस्य पदाच्या शर्यतीतून नऊ जणांनी माघार घेतली. सुनसगाव येथे सरपंच पदासाठी दोन तर सदस्य एक जणांनी माघार घेतली. पिंप्रीसेकम येथे एका इच्छूकाने माघार घेतली. गोजोरे येथे सरपंच पदासाठी चार तर सदस्यासाठी 14, चोरवड येथे सरपंचपदासाठी तीन तर 10 सदस्यपदासाठी, वराडसीम येथे सरपंचपदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 41 आणि सुनसगाव येथे सरपंचपदासाठी दोन तर सदस्यपदासाठी 22 तर पिंप्रीसेकम येथे सदस्यासाठी पाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.