सरला पाटील यांची नियुक्ती

0

कासोदा। निपाणे ता. एरंडोल येथील भाजपाच्या महिला प्रदेश कमिटी सदस्या सरला लहू पाटील यांची एरंडोल तालुका दक्षता समितीवर अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सत्कार भाजपा ज्येष्ठ नागरिकचे जिल्हा सचिव आनंदा हरी मिस्तरी यांनी केले.

त्यांच्या सोबत भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी होते. या प्रसंगी सरला पाटील म्हणाल्या की, गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मिळावी. अनेक गोरगरीबांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्यांच्यासाठी प्रयत्न करील, नविन रेशन मिळत नसल्याने गैरसोय होत आह. त्यासाठी ही प्रयत्न करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. व रेशनदुकानदार व ग्राहक यांच्यातील संबंध प्रेमाचे रहावे माझ्या हातून सेवा घडावी अशी इच्छा व्यक्त केली.