सरसकट पंचनामे करून केळी उत्पादकांना भरपाई द्यावी

0

माजी आमदार शिरीष चौधरी ; रावेरला बैठक

रावेर- विमा कंपनीला शासनच जर आर्थिक मदत करत असेल तर सरसकट पंचनामे करून भरपाई देण्यास काय अडचन आहे? असा प्रश्‍न उपस्थित करीत वेदर स्टेशनच्या हवेनुसारच केळीच्या बागा आडव्या झाल्याने शासनाने वाट पाहण्याची भूमिका सोडून शेतकर्‍यांना तत्काळ मदत करावी, असे माजी आमदार शिरीष चौधरी म्हणाले. तालुक्यातील केळी संदर्भातील निवेदन तयार करून माजी कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले. कृषी उपन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये केळी नुकसानी संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, अ‍ॅड.रवींद्र पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, रमेश पाटील यांनी शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीला माजी बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी, उपसभापती अर्जुन पाटील, सोपान पाटील, ईश्वर रहाणे, सदस्य योगेश पाटील, दीपक पाटील, महेबूब तडवी, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, ज्ञानेश्वर महाजन, पितांबर पाटील, हरीष गनवाणी, ज्ञानेश्वर महाजन, जनार्दन पाचपांडे, सुर्यभान चौधरी, रवींद्र चौधरी, प्रवीण पाटील, गणेश बोरसे, डी.एन.महाजन, हृदयेश पाटील, योगेश कोळी, सचिन पाटील, लालचंद पाटील, जिजाबराव चौधरी, पी.आर.पाटील, सुरेश पाटील, गणपत चौधरी, बाजार सामिती सचिव गोपाळ महाजन उपस्थित होते.

माजी कृषी मंत्री शरद पवारांना भेटणार शेतकरी
‘निपाह’ची समस्या गंभीर असून उत्तर भारत केळीला भाव नाही तालुक्यात वादळी पावसाने केळीच्या बागा आडव्या झाल्या असून विमा कंपनी भरपाई करण्यास दिरंगाई करत आहे यासह अनेक केळी संबधित समस्या घेऊन माजी कृषी मंत्री शरद पवार यांची रावेर तालुक्यातील शेतकरी भेटणार असून या संदर्भात येत्या रविवारी दुपारी तीन वाजता पुन्हा बैठक घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.