सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधन साजरा

0
जळगाव– सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शनिवारी इयत्ता ५ ते १० वीच्या विद्यार्थ्यांच्या सृजनशक्तीला चालना मिळावी आणि त्यांच्या हातून नवनिर्मिती व्हावी, या उद्देशाने कमी खर्चात स्वत:च्या राख्या बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. तसेच विद्यालयात रक्षाबंधननिमीत्त मुलींनी मुलांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष मनोज पाटील,  मुख्याध्यािपका कल्पना वसाने, विद्या पाटील उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मुलांनी बनवलेल्या राख्यांच्या प्रदर्शनाने करण्यात आली. विद्याथ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रत्येक वर्गातून ३ क्रमांक काढण्यात आले. प्रथम क्रमांक गौरी चौधरी (इ. ५वी) हीचा आला. सर्व विजेत्यांना मनोज चौधरी यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आले़यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक ज्ञानेश्वर पाटील, तुषार पवार,स्वप्नील पाटील, सुप्रिया पाटील, सुलोचना पाटील, अत्तरदे मॅडम, गिरीष महाजन, शरद बिºहाडे आदींनी परिश्रम घेतले.