सरस्वती विद्यालयात गोकूळाष्टमी निमित्त दहीहंडी रंगला सोहळा

0

जळगाव-शहरातील शिवकॉलनी परिसरातील सरस्वती विद्यालयात गोकूळाष्टमी निमित्त दहीहंडी सोहळा रंगला होता. यावेळी राधा कृष्णाच्या वेशभुषेत असलेल्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडत जल्लोषात हा सोहळा साजरा केला.

जळगाव सरस्वती विद्यामंदिर या शाळेत गोकुळष्टमी निमित्त सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यानिमित्त सपूंर्ण शाळा सजविण्यात आली होती. तसेच रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. सकाळपासून शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये देखिल उत्साह संचारला होता. शाळेच्या पटांगणात दहीहंडी बांधण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात दहीहंडी पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथ म्हणून अध्यक्ष मनोज आत्माराम पाटील, सचिव ज्योती पाटील, उपस्थित होते. मान्यवरांनी दहीहंडी पूजन केल्यानतंर सोहळ्याला सुरुवात झाली.

पाचवीचे आदित्य पाटील याने श्रीकृष्णाची वेशभूषा साकारली होत तर गौरी चौधरी ही राधाच्या भूमिकेत होती. दहीहंडीच्या सोहळ्याची सुरुवातच ढोल ताशाच्या निनादात करण्यात आली. संगीताच्या तालावर नृत्य करीत विद्यार्थ्यांनीच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दहीहंडी फोडली. या कार्यक्रमास मुख्याध्यापिका कल्पना वसाने, विद्या पाटील, शिक्षक ज्ञानेश्वर पाटील, तुषार पवार, स्वप्निल पाटील, निलीमा भारंबे, उज्वला ब्राम्हणकर सुप्रिया पाटील सुलोचना पाटील माधुरी अत्तरदे, सुवर्णलता अडकमोल, सविता ठाकरे गिरिष महाजन व शरद बि-हाडे देखत्रल उपस्थित होते.