सराफावर चाकूने हल्ला करीत ३८ लाखांचा ऐवज लांबवला
नरवेल रस्त्यावर दरोडा चाकूचा धाक दाखवत ३७ लाखाचा सोने चांदीचा आवाज लंपास
Thrilling of the day: Narvel’s bullion shop robbed of 38 lakhs in knife attack मुक्ताईनगर : मुक्ताईनगर-नरवेल रस्त्यावर घराकडे निघालेल्या सराफा व्यापार्यावर दुचाकीवरून आलेल्या लुटारूंनी हल्ला करीत त्यांच्याकडील सुमारे ३७ लाखांचा सोन्या-चांदीसह रोकड असलेला ऐवज लांबवल्याने व्यापार्यांमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. हल्ल्यात सराफा व्यापारी जखमी झाले आहेत. मुक्ताईनगर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.
दुचाकी अडवत केली लूट
नरवेल येथील निलेश वसंत सोनार यांचे उचंदा येथे धनाई ज्वेलर्स नामक दुकान असून दररोज ते गावावरून उचंदा येथे दुचाकीने अप-डाऊन करतात. माहितगार चोरट्यांनी सराफा घराकडे दुचाकीवर एकटेच असल्याचे पाहून त्यांचा पाठलाग केला. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सराफा व्यापारी निलेश वसंत सोनार यांच्या दुचाकीपुढे लुटारूंनी त्यांच्या दुचाकीची डिक्की दगडाने फोडली तसेच सराफाने प्रतिकार करताच त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे ७०० ग्रॅम सोने, तसेच तीन किलो चांदी तसेच ८० हजारांची रोकड मिळून सुमारे ३७ लाखांचा ऐवज घेवून लुटारू दुचाकीने पसार झाले.
आमदारांनी पोलिसांना केल्या सूचना
सराफावरील हल्ल्याची माहिती कळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी भेट देत जखमीची विचारपूस करीत पोलिसांना सूचना केल्या. लुटीची घटा कळताच नरेंद्र दुट्टे, राजू तराळ, मोहन बेलदार तसेच नरवेल गावचे सरपंच मोहन महाजन यांना घटनास्थळ गाठले. पोलिस अधीक्षक यांना भ्रमणध्वनीवरून या संदर्भात माहिती देण्यात आली.
अवैध धंद्यांच्या वाढल्या तक्रारी
गत आठवड्यात रुईखेडा गावाजवळ अवैधरीत्या दारूचा चालणारा कारखाना व केवळ पाचच दिवसात ३७ लाखांचा दरोडा यामुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. मुक्ताईनगर तालुयात अवैध धंदे वाढल्याची ओरड असून पोलिस प्रशासनाने याबाबतही दखल घेण्याची अपेक्षा सुज्ञ नागरीक व्यक्त होत आहे.