सर्पदंश झाल्याने वृध्दाचा मृत्यू

0

जळगाव – पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथे राहणाऱ्या एका 67 वर्षीय वृध्दास राहत्या घरात सापाने चावा घेतला असता त्यांना उपचारासाठी जळगावात खासगी वाहनाने नेत असतांना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत जिल्हा पेठा पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, राधो शंकर भिल (वय – 67) रा. वेरूळी ता. पाचोरा हे रविवारी सायंकाळी 4.30 वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी ओट्यावर बसले असता सापाने चावा घेतला. त्यांना तातडीने नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात खासगी वाहनाने नेण्यात आले. सायंकाळी 5.30 वाजता वैद्यकिय अधिकारी डॉ. कुरकुरे यांनी मयत घोषीत केले. याबाबत जिल्हापेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ दिलीप सोनार करीत आहे.