सर्बियातील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा धमाका

0

सर्बिया : सर्बियात नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय पथकाने अर्ध्या डझन पदकांची कमाई करत धमाका केला आहे. नीरजकुमारीने मिळविलेल्या सुवर्णपदकासह भारतीय खेळाडूंनी कझाकिस्तान व रशियन खेळाडूंचा समावेश असूनही या स्पर्धेत चांगले यश मिळविले. नीरजकुमारीने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेताना ५१ किलो गटात सोनेरी कामगिरी केली. सरजूबाला देवी, प्रियंका चौधरी, पूजा व नीरजकुमारीने प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेताना ५१ किलो गटात सोनेरी कामगिरी केली. सीमा पुनिया यांनी रौप्यपदक मिळविले, तर प्रौढ खेळाडू कविता गोयाटला कांस्यपदक मिळाले.

भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक गुरबक्षसिंग संधू यांनी सांगितले, ‘‘युरोपातील बर्फाच्या वादळामुळे विमानवाहतुकीवर अनिष्ट परिणाम झाला होता. अनेक टर्किला नेणारे उड्डाणे स्थगित करण्यात आली होती. आमचेही सर्बियाला जाणारे विमान रद्द झाले होते. आम्हाला विमानतळावर २४ तास काढावे लागले. आम्ही त्वरित भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला दुसऱ्या विमानाची तिकिटे उपलब्ध करून दिली.

संधू पुढे म्हणाले की, आम्ही व्हर्बास येथे पोहोचलो. तथापि आमचे सामान पोहोचले नाही. ते मिळाल्याखेरीज आम्हाला स्पर्धेत प्रवेश मिळणे अशक्य होते. खेळाडूंच्या हातामधील बॅगमध्ये बॉक्सिंगपटूंचे साहित्य होते. तरीही संयोजकांनी वैद्यकीय दाखले नसतानाही आम्हा खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी दिली. वेळेवर सामान न पोहोचल्यामुळे विमानतळावर २४ तास थांबावे लागूनही या खेळाडूंनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.