सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाने उमटवला ठसा

0

रावेर येथे माजी आमदार अरुण पाटील ; नवज्योती कृषी पुरस्काराचे वितरण

रावेर- पुरस्कारार्थी नारीशक्तीमुळे महिला कुठेही कमी नाही, सर्वत्र क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविण्यात महिला अग्रेसर आहे, त्यांच्या भरीव कामांमुळे पुढील पिढी नक्की सृजनशील असेल, असे माजी आमदार अरुण पाटील यांनी येथे व्यक्त केले. शहरातील मराठा मंगल कार्यालयात नवज्योती कृषी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रसंगी ते बोलत होते.

यांची होती प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमास उद्योजक श्रीराम पाटील, जितेंद्र पवार, उपनगराध्यक्ष अ‍ॅड.सुरज चौधरी, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, माजी नगराध्यक्ष हरीष गनवानी, पद्माकर महाजन, जिल्हा परिषद सदस्या रंजना पाटील, पंचायत समिती सदस्य प्रतिभा बोरोवले, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, विरेंद्र भोईटे, वनक्षेत्रपाल आर.जी.राणे, सावखेडा सरपंच मीना पाटील, देवयानी पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक कृष्णा पाटील यांनी तर सूत्रसंचलन योती पाटील यांनी केले.

उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांचा गौरव
यावेळी सर्वत्र क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या डॉ.प्रीती सावळे, कल्पना पाटील, कविता पवार, सुचिता पाटील, शारदा पाटील, अ‍ॅड.भारती मुजुमदार, मंजूश्री पवार यांच्यासह सुमारे 35 महिलांचा ‘नवज्योती कृषीसेवक पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, राजकीय, साहित्यिक, उद्योजक अश्या विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या महिलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.