सर्वपक्षीयांतर्फे इंदापुरात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

0

इंदापूर । इंदापुरातील सर्व पक्षीयांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिराव फुले यांची 186 वी जयंती नगरपरिषद मैदानावर उत्साहात साजरी करण्यात आली. नगरसेविका राजश्री अशोक मखरे, तहसिलदार श्रीकांत पाटील व पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात करून आदरांजली वाहण्यात आली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा संघटन सचिव शिवाजिराव मखरे यांनी सावीत्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती दिली. अरविंद वाघ, अ‍ॅड. राहुल मखरे, संदीपान कडवळे, हरिदास हराळे, संजय शिंदे, माउली वाघमोडे, नितिन आरडे, विशाल चव्हाण, अमोल मिसाळ, पप्पु पवार, महेश सरवदे यांच्यासह इंदापूर शहरातील सर्व जाती-धर्मातील अनेकांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

नगरसेवकांची आदरांजली
इंदापूर नगरपरिषदेच्या कार्यालयातही सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा अंकीता शहा यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, विरोधी पक्षनेता पोपट शिंदे, नगरसेविका राजश्री मखरे, नगरसेवीका हेमलता माळुंजकर यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवकांची उपस्थिती कमी असल्याचे यावेळी जाणवले. नारायणदास रामदास हायस्कुल, कला वाणिज्य महाविद्यालयातही सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.