सर्वपक्षीय बैलगाडी मोर्चा

0

शिरपूर । शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना बंद आहे तो सुरु व्हावा, या मागणीसाठी सर्वपक्षीय बैलगाडी मोर्चा शिसाका चेअरमन राहत असलेले वाडी गावापर्यंत वाजत-गाजत काढण्यात आला. मंगळवार, 15 रोजी दुपारी 4 वाजता या मोर्च्याला शहरातील बाबुराव वैद्य मार्केटपासून सुरुवात झाली. मोर्चा मेनरोड मार्गाने पाचकंदिल चौक, वाघाडी मार्गे वाडी येथे राहत असलेले कारखान्याचे चेअरमन माधव आनंदराव पाटील यांच्या गावापर्यंत काढण्यात आला.

यांचा होता सहभाग
मोर्चात भाजपा जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, किविप्र संस्थेचे अध्यक्ष तुषार रंधे, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल रंधे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, तालुका प्रभारी डॉ. जितेंद्र ठाकुर, दिलीप लोहार, अशोक श्रीराम, अ‍ॅड. गोपाल राजपूत, मोहन पाटील, नगरसेवक राजेंद्र गिरासे, मयुर राजपूत, अ‍ॅड. अमित जैन, नगरसेवक रोहित रंधे, सेनेचे भगतसिंग राजपूत, राजू टेलर, राष्ट्रवादीचे प्रशांत पाटील, प्रहार जनशक्तीचे ईश्‍वर बोरसे, मिलींद पाटील, अरुण धोबी, प्रमोद पटेल, चेतन पाटील, राज सिसोदीया, चंद्रकांत पाटील, संदिप पाटील, राहूल देवरे, भटू माळी, मुकेश बोरसे, निलेश महाजन, मुरलीधर पाटील, रविंद्र शिंदे, विशाल पवार, योगेश धोबी, कल्पेश जमादार, रविंद्र गिरासे, हेमराज राजपूत, महेंद्र पाटील, प्रशांत चौधरी, अ‍ॅड.संतोष पाटील, प्रा. पी.एस.अंतर्लीकर, अ‍ॅड.हिरालाल परदेशी, शशांक रंधे, महेंद्र राजपूत, अंबालाल राजपूत, दिपक जमादार, शांतीलाल पाटील, रणजितसिंह रावल, सत्तारसिंग गिरासे, शाम पाटील, प्रकाश जमादार, भालचंद्र राजपूत राजेंद्र देवरे, ब्रिजलाल मोरे, राधेशाम भोई, संजय आसापुरे, सुभाष राजपूत, विक्की चौधरी, मोबिन शेख, रहीम खाटीक यांच्यासह शेतकरी विकास फाऊंडेशन, युवा शेतकरी मंच, ऊस उत्पादक व कामगार सहभागी झाले होते.

आंदोलना मागील भूमिका…
शिसाका गेल्या सहा हंगामांपासून बंद आहे. दोन वर्षापूर्वी शिसाकाची निवडणूक झाली. निवडणुकीच्या वेळेस कारखाना बंद अवस्थेत असून त्यावरील कर्ज व इतर अडचणींबाबतची पूर्ण कल्पना पॅनलमधून उमेदवारी करणार्‍या उमेदवारांना होती. त्या परिस्थितीत लवकरात लवकर कारखाना सुरू करण्याचे आश्‍वासन देऊन वर्चस्व मिळविले. परंतु गेले दोन वर्ष उलटूनही ही प्रत्यक्षात कारखाना सुरू करण्यासाठी ठोस कार्यवाही नाही. जिल्हा बँक कारखाना ताब्यात घेण्यास तयार असूनही मात्र तो अद्यापपर्यंत ताब्यात घेतलेला नाही.