येरवडा । समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास आपण प्राधान्य देणार असल्याचे मत रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी ऑफ इंडियाचे नवनिर्वाचित जिल्हा संघटक अशोक तनपुरे यांनी व्यक्त केले. तनपुरे यांची पक्षाच्या जिल्हा संघटकपदी निवड झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते युवराज जाधव-भाडळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बोखारे, लता जाधव, शुभम जाधव, मंगल जाधव, रशीद सय्यद, शुभम सोनावणे आदी उपस्थित होते. तनपुरे म्हणाले की, समाजातील महिलांमध्ये जनजागृती करून महिलांना पक्षाच्या माध्यमातून संघटित करण्याचे काम करणार आहे. बचत गट स्थापन करून त्यांना रोजगार उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. बालकामगारांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्या उपक्रमाची माहिती देऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजा बोखारे यांनी मानले.