सर्वांशीच जिव्हाळ्याचे संबंध असल्याने तत्कालीन विधानसभाध्यक्षांचा पराभव करू शकलो

0

रावेर शहरात माजी आमदार अरुण पाटील यांचे प्रतिपादन

रावेर- सर्व जाती-धर्माच्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबध असल्यानेच तत्कालीन विधान सभाध्यक्ष स्व.मधुकरराव चौधरी यांचा पराभव करू शकलो व त्यावेळी त्यांच्या विरुध्द निवडणूक लढायला सुध्दा पक्षांना उमेदवार मिळत नसतांना माझा दणदणीत विजय झाला म्हणून समाजाचे कार्य करत रहा योग्य वेळ आल्यावर समाजच आपले मूल्यमापन करून राजयोग आपल्या पदरी टाकतात, असे प्रतिपादन माजी आमदार अरुण पाटील यांनी येथे करीत 1995 च्या आठवणींना उजाळा दिला.

यांची होती उपस्थिती
शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हॉलमध्ये वाढदिवसाच्या एका खाजगी कार्यक्रमात माजी आमदार पाटील बोलत होते. यावेळी कामगार नेते दिलीप कांबळे, राष्ट्रवादी किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, कृषी उपन्न बाजार समिती उपसभापती अरुण पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, बाजार समिती संचालक गोंडु महाजन, माजी नगरसेवक अ‍ॅड.योगेश गजरे, दिलरुबाब तडवी, अशोक शिंदे, राजू खिरवडकर, प्रा.चतुर गाढे, प्रा.सी.एच.पाटील, आर.एस.लहासे, हिरालाल सोनवने आदींनी मनोगत व्यक्त केले.