सर्वात कमी तापमानात आणि नदीत जवानांनी केला योगा

0

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठिकठिकाणी योगाची प्रात्यक्षिके सादर केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील डेहराडून येथे आयोजित कार्यक्रमात योगासने केली.

‘आयटीबीपी’च्या जवानांनी तब्बल १८ हजार फूट उंचीवर योगासने केली. सर्वाधिक कमी तापमान तसेच पारा निचांकी अवस्थेत असलेल्या लडाखमध्ये जवानांनी योगासने केली. यावेळी जवानांनी केलेल्या सूर्यनमस्काराचा व्हिडिओ समोर आला आहे. लष्काराच्या जवानांचा एक गट सूर्यनमस्कार करताना दिसून येत आहे. आयटीबीपीच्या जवानांनी नदीत योगासने केली. लोहितपूरमधील डोगारु नदीत जवानांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली.