सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात उपलब्ध झाला-देवेंद्र फडणवीस

0

मुंबई-देशात ८० लाख एपीएफओचे नवीन खाती सुरु झाली. रोजगार मिळाल्यानंतरच एपीएफओ खाते सुरु होत असते. त्यामुळे प्रत्यक्ष रोजगार मिळाला आहे. देशात महाराष्ट्र सर्वाधिक एपीएफओ खाते सुरु झाले आहे. या आकडेवारीरून महाराष्ट्र देशात सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देणारा राज्य ठरला आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी याबाबत माहिती दिली. आहे.

महाराष्ट्र सरकारने वर्ल्ड बँकसोबत करार केला असून स्मार्ट ग्राम उपक्रम राबविला जाणार आहे. राज्यात १० हजार गावांमध्ये शेतकऱ्यांचे गट तयार केले जाणार आहे. त्यातून एक पणन व्यवस्था उभी केली जाणार असून शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ही माहिती दिली.

मतदानात ‘नोटा’चा वापर चुकीचा
निवडणुकीच्या मतदानात ईव्हीएमवर नोटा (कोणालाही मत नाही) हा पर्याय देण्यात आला आहे. अनेक मतदार याचा वापर करतात. मात्र नोटाचा वापर करू नये. नोटाचा वापर करणे म्हणजे मत वाया घालणे होय असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.