नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालय हे पिकनिक स्पॉट नाही,या शब्तात सर्वोच्च न्यायालयाने आयकर विभागाची कानउघाडणी केली. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यास विलंब झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
आयकर विभागाविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये एका प्रकरणात निकाल दिला होता. या निर्णयाला तब्बल दीड वर्षांनी आयकर विभागाने आव्हान दिले. तसेच आव्हान देण्यास उशीर का झाला ? याचे समाधानकारक उत्तर आयकर विभागाला देता आले नाही. तसेच विभागाची बाजू न्यायालयात मांडणाऱ्या वकिलांनी दिशाभूल केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.