जळगाव । जिल्ह्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या काही वर्षापासून सातत्यपूर्ण साहित्य, नाट्य, संगीत, चित्र, शिल्प अशा कलाप्रकारात प्रयोगशील उपक्रमाची निर्मिती व यशस्वी आयोजनाबद्दल अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे पुरस्कार सोहळयाचे दिमाखदार अशा पुरस्कार सोहळ्यात माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
अखिल भारतीय नाट्य परिषदेचा या वर्षाचा महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ठ प्रायोगिक संस्थेचा कै.विनय आपटे ,कै. अविनाश फणसेकर व कै. भाई बोरकर पुरस्काराने परिवर्तन जळगाव संस्थेला सन्मानित करण्यात आले. नाट्य निर्माते अनंत पणशीकर, उदय धुरत, लता नार्वेकर, श्रीपाद जोशी, गोपाळ अलगीर , दिनू पेडनेकर , प्रसाद कांबळी , संदेश भट , आनंद नांदलोटकर या मान्यवरांच्या हस्ते परिवर्तनच्यावतीने मंजूषा भिडे, मोना तडवी, मंगेश कुलकर्णी, योगेश चौधरी, राहुल निंबाळकर , हर्षल पाटिल, प्रतीक्षा कल्पराज यांनी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारला. या यशाबाद्द्ल परिवर्तनचे सर्वांकडून अभिनंदन होत आहे.