जळगाव-क्यूएसद्वारा भारतातील सर्वोत्तम 75 विद्यापीठांच्या जाहीर झालेल्या यादीत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने 56 वे स्थान प्राप्त केले आहे. या यादीत असलेल्या महाराष्ट्रातील विद्यापीठात हे विद्यापीठ तिसज्या स्थानावर आहे.
क्वाक्क्वारेली सायमंड्स (क्यूएस) ही शिक्षण क्षेत्रात काम करणारी असून ब्रिटीश कंपनी असून या कंपनीकडून भारतात गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणाज्या सार्वजनिक, खाजगी विद्यापीठांचे रँकिंग करण्यात आले आहे. या रँकिंगच्या मूल्यांकनासाठी संशोधन, अध्ययन, रोजगार क्षमता, ऑनलाईन/दुरस्थ शिक्षण, सामाजिक दायित्व, नाविन्यपूर्ण कल्पना, सर्वसमावेशकता असे काही निकष निश्चित करण्यात आले होते. देशातील सर्वोत्तम 75 विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने 56 वे स्थान प्राप्त केले आहे.
विद्यापीठातील पीएच.डी प्राप्त शिक्षकांसाठी 77.3 गुण, अध्यापकांच्या एकूण शोधनिबंधासाठी 73.1 आणि प्रत्येक शोधनिबंधाच्या उद्वरण (सायटेशन) साठी 76.9 गुण प्राप्त झाले आहेत. या आधारे विद्यापीठाने हे स्थान पटकावले आहे. या यादीत पारंपारिक शिक्षण देणाज्या महाराष्ट्रातील चार अकृषि विद्यापीठांचा समावेश असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तिसज्या स्थानावर आहे.
कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाने गेल्या दोन वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली असून नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यापीठात राबविले जात आहेत. विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या संशोधनासाठी देखील सातत्याने भर दिला जात असून पायाभूत सुविधा पुरविण्यावर कुलगुरुंचा भर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या विद्यापीठाचा विद्यार्थी मागे राहता कामा नये यासाठी कुलगुरुंच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकार मंडळे शौक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी कार्यरत आहेत. विद्यापीठाने देश पातळीवर स्थान प्राप्त केल्यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.