सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणमुक्त व्हायलाच हवेत ! – हिंदु जनजागृती समिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर नुकतेच काही धर्मांध मुसलमानांनी अनधिकृत प्रार्थनास्थळ निर्माण केले होतेजागृत हिंदूंनी आवाज उठवल्यानंतर ते हटवण्यात आलेमात्र अशाच प्रकारचे अनधिकृत बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मुख्य केंद्र असलेल्या कुलाबा किल्ल्यावर देखील झाल्याचे उघड झाले आहेया किल्ल्यावर अनधिकृत मजार उभारण्यात आली असून तिला पांढर्‍या रंग देण्यात आला आहेअशा छोट्या अनधिकृत मजारींचे रुपांतर नंतर दर्ग्यात आणि पुढे जाऊन मशिदींमध्ये केले जातेबेकायदेशीर बांधकामांद्वारे हे भूमी हडपण्याचे एक तंत्र असून हे बांधकाम तात्काळ हटवावे आणि संबधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेतअशी मागणी हिंदु जनजागृती समिती‘ आणि राजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभाग‘ यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण मुंबई विभागतसेच मुंबई आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहेया वेळी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या साहाय्यक पुरातत्त्व शास्त्रज्ञ श्रीमती फाल्गुनी काटकर यांनी कुलाबा किल्ल्यावर आमचे अधिकारी जाऊन आले असून ते दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहेतअसे आश्‍वासन दिले.

या वेळी भारतीय पुरातत्त्व विभागात समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्रीबळवंत पाठकराजे प्रतिष्ठान दुर्ग संवर्धन विभागाचे मुंबई अध्यक्ष श्रीरोशन जंगमबेलसेकर आणि श्रीराहुल आस्कट यांनीतर मुंबईचे जिल्हाधिकारी श्रीराजीव निवतकर आणि रायगडच्या उपजिल्हाधिकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांना समितीचे सर्वश्री सतीश सोनारमंजुनाथ पुजारीसौविशाखा आठवलेअवधूत बनेगिरीश जोशी आणि उदय तेली यांनी निवेदन दिले.

कुलाबा किल्ल्यांवरील अतिक्रमणाविषयी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज श्री
रघुजीराजे आंग्रे यांनी काही दिवसांपूर्वीच तक्रार दाखल केली होतीया संदर्भात हिंदु जनजागृती समितीने ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडलेत्यांच्यावर कारवाई झाली पाहिजेतसेच राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत कायाचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तत्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावीअशी मागणी केलीपुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी हे अतिक्रमण न हटवल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात तीव्र आंदोलन छेडेलअशी चेतावणीही समितीने दिली आहे.

हिंदवी स्वराज्याचा कणा असलेले हे शेकडो गडकिल्ले राज्याचा ऐतिहासिक ठेवा आहेअसे असतांना अनेक किल्ल्यांवर धर्मांधांनी अनधिकृत बांधकामेमजारप्रार्थनास्थळे उभी करून किल्ल्यांचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला आहेछत्रपती शिवरायांनी राज्यातील पाच इस्लामी पातशाह्यांना संपवलेतरी इस्लामी आक्रमणे आजही थांबलेली नाहीतराज्यातील सर्व गडकोट इस्लामी आक्रमणमुक्त व्हायलाच हवेतअसेही हिंदु जनजागृती समितीने म्हटले आहे.