नंदुरबार । विकास कामांसाठी जो निधी मिळतो त्याचा समान अधिकारी मुस्लिम, दलीत, आदिवासी या अल्पसंख्यांक बहुलवस्तींच्या विकासासाठी मिळाला पाहिजे, यासाठी आचमा लढा सुरू आहे. तो अधिकार मिळविण्यासाठीच आपण निवडणूक लढवित आहे. अशी भूमिका एमआयएमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सैय्यद रफअत हुसैन सदाकत हुसैन यांनी जनशक्तीशी बोलतांना मांडली. नंदुरबार नगर पालिका निवडणूकीत रफअत सैय्यद हे नगराध्यपदासाठी निवडणूक लढवित आहेत. त्याच बरोबर प्रभागात 6 उमेदवार एमआयएमने उभे केले असून या निवडणुकीत एमआयएमची भूमिका लक्षवेधी ठरणार आहे.
भूमिका महत्त्वाची ठरणार
नंदुरबार येथे मित्रमंडळाच्यावतीने रूग्णांसाठी सवलतीच्या दरात रूग्णवाहीका उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांच्या अडीअडचणी ऐकूण घेण्यासाठी व त्या सोडविण्यासाठी 24 तास पक्षाचे कार्यालय जनसंपर्काच्या रूपाने सुरू आहे. मुस्लीम समाजाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे काम एमआयएमने केले असून त्याचे फलीत शहादा नगर पालिका निवडणूकीत पाहायला मिळाले आहे. आजच्या स्थितीत शहादा येथे एमआयएमच्या माध्यमातून साडेतीन कोटींची कामे सुरू असल्याने नागरीक समाधानी आहेत. एमआयएमच्या माध्यमातून मुस्लिम समाजाबरोबरच इतर समाजचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. तरूणांवर जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्यांच्या मदतीला लोकप्रतिनीधी नव्हे तर आम्ही धावून जातो. कोणत्याही शासकीय कामात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करून त्यांना दिलासा देण्याचे काम एमआयएमच्या माध्यमातून करण्यात आले आहे. उपेक्षीत-वंचीत घटकाला न्याय मिळावा यासाठी आपण नंदुरबार नगरपालिका निवडणूकीत नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलो आहोत. त्याच आमचा विजय निश्चित स्वरूपाचा राहणार असून भाजप-काँग्रेसच्या लढाईत माझी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे असा विश्वास सैय्यद रफअत सैय्यद यांनी व्यक्त केला.
केवळ राजकारणापुरता वापर
सैय्यद रफअत म्हणाले की, नंदुरबार शहरातील अल्पसंख्यांक मतदारांची संख्या 29 हजाराच्या आसपास असतांना या समाजाला प्रतिनिधीत्व देतांना कंजुषी केली जाते. 1992मध्ये नगरपालिकेत एकूण 22 नगरसेवकांची संख्या असतांना 6 मुस्लिम नगरसेवक निवडणून येत होते. आता तर नगरसेवकांची संख्या 39 इतकी झाली आहे. वार्ड रचना वाढली असून मुस्लिम मतदारांची संख्या देखील कमालीची वाढली आहे. संख्येनुसार प्रतिनिधीत्व देणे आवश्यक असतांना सत्ताधारी नेत्यांकडून तसे होत नाही. शिवाय जे नगरसेवक असतात ते अशिक्षीत असतात त्यामुळे नागरिकांच्या समस्या ते प्रभावीपणे मांडू शकत नाही म्हणून प्रभागातील वस्तीत पाणी, गटारी, लाईट, रस्ते, आरोग्य या सारख्या मुलभूत समस्या आ-वासून तशाचा राहतात. निवडणूक आल्यावरच या समस्या जाणून घेण्याचा चमत्कार होतो. वर्षांनुवर्ष मुस्लिम समाज हा सत्ताधार्यांच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे. मात्र, त्यांचा वापर केवळ राजकाराणापुरताच केला जात असतो.
सामान्यांच्या समस्यांना प्राधान्य
सत्तेत कुणी येत-कोण जात त्याच आम्हाला काही घेण देण नाही. मात्र, मुस्लिम वस्तीचा सर्वांगीन विकासासाठी समान निधी खर्च करणे अपेक्षीत आहे. चिरागगल्ली परिसरात शहराची डे्रनेज लाईन काढण्यात आली आहे. तीचा प्रश्न अद्यापही सुटला नसून या भागातील नागरिकांचे आरोग्य त्यामुळे नेहमी धोक्यात येत असते. याचा कुणीच विचार करत नाही. हा बदल घडवून आणण्यासाठी एमआयएमने पुढाकार घेऊन उमेदवार उभे केले आहेत. हा पक्ष 1958 पासून जुना पक्ष असून नागरिकांच्या समस्यांना प्राधान्य देणे तरूणासाठी रोजगार उभारणे, आरोग्य, मुलभूत सुविधा हाच आमचा निवडणूकीचा जाहीरनामा असल्याचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रफअत सैय्यद यांनी सांगितीले. एमआयएम हा पक्ष सत्तेत नसला तरी नागरिकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे.