नवापुर । जा गतिक लोकसंख्या दिन (11 जुलै) तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय नवापुर मार्फत साजरा करण्यात आला.यात प्रामुख्याने तालुक्यातील आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच आशा कार्यकर्ती यांच्यामार्फत रँलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जि.प अध्यक्षा रजनी नाईक,पंचायत समिती सभापती सविता गावीत,उपसभापती दिलीप गावीत, पं.स सदस्य जालमसिंग गावीत,विजय गावीत, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर,तालुका आरोग्य अधिकारी हरिषचंद्र कोकणी यांनी रँलीला मार्गदर्शन केले.
जि.प.अध्यक्षा रजनी नाईक यांचे आवाहन
रॅलीची सुरुवात पंचायत समिती येथुन जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक.पं स सभापती सविता गावीत.उपसभापती दिलीप गावीत. यांनी रँलिला हिरवा झेंडा दाखववुन रँलिला सुरुवात पंचायत समिती येथुन केली. रँली मेनरोड येथुन निघुन महात्मा गांधी पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन जोडप्यांनी जबाबदारी स्विकारा- कुटुंब नियोजनाचा अवलंब करा या घोष वाक्याप्रमाणे तालुक्यात सर्व जनसमुदयात हा विचार पोहचविण्याचे आव्हान जि.प अध्यक्षा रजनी नाईक यांनी रँलित सहभागी जन समुदायास केले.
कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया शिबीराचे नियोजन
रॅलीला मार्गदर्शन करताना तालुका आरोग्य अधिकारी हरीशचंद्र कोकणी यांनी जागतिक लोकसंख्याचे औचित्य साधुन सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. तसेच प्रा.आ.केंद्र चिचपाडा येथे कुटुंब नियोजन शस्ञक्रिया शिबीराचे नियोजन केले असल्याबाबत सांगितले.तसेच 11 जुलै ते 30 जुलै 2017 पर्यत दिवसनिहाय घेण्यात येणारे गावपातळी पासुन घेण्यात येणार्या कार्यक्रमाबाबत रुपरेषा समजावुन सांगितली.
कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग करा
जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी सांगितले की सदस्यांनी तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी तालुक्याच नाही तर जिल्हयात कशा प्रकारे छोटे परिवार ठेवण्यासाठी शस्ञक्रियांचे तसेच कुटुंब नियोजन साधनांचा उपयोग करुन नंदुरबार जिल्हा सुरक्षित करता येईल यासाठी सर्वाना सुचना केल्या.पं.स उपसभापती दिलीप गावीत यांनी कुटुंब नियोजनाचे परिवारासाठी काय महत्व आहे व त्यावर परिवाराची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारे सुधारते याबाबत मार्गदर्शन केले.गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर म्हणाले की, छोटे कुंटुबाची व्याख्या सांगतांनाच ते कशा प्रकारे छोटया परिवारामुळे कुपोषनाचे प्रमाण कशा प्रकारे कमी होईल.कुशल करता येईल याबाबत मार्गदर्शन केले.