तळोदा । सर्व समाजाला सोबत घेऊन विकास शक्य समाजात दुफळी माजवणारी प्रवृत्तीपासून आपण सावध असले पाहिजे असे मत आमदार पाडवी यांनी व्यक्त केले. येथील मन्सूरी समाज पंचच्या जमात खानाच्या भूमीपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला.
भरघोस निधी उपलब्ध
या वास्तूसाठी उपस्थित मान्यवर कडून आर्थिक मदत घोषित या वेळी करण्यात आली यात आमदार उदयसिंग पाडवी यांनी 11 लाख रक्कम जाहीर केली तर तलोद्याचे सामाजिक कार्यकर्ते योगेश चोधरी यांनी 77 हजार 777 इतकी रक्कम जाहीर केली. हाजी निसार दादा मकरानी 25000 देणगि जाहिर केली पालिका गटनेते भरत माळी यांनी 21 हजार तर रमीज सर यांनी 21 हजार रुपये निखिल तुरखिया यांनी 11 हजार रुपये कार्यक्रम सुत्रसंचलन मराठे यांनी केले.दरम्यान यावेळी शिरखुर्माचे देखील नियोजन आयोजकांकडून करण्यात आले होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी येथील प्रगतशील शेतकरी निसार मकराणी,भरत माळी,डॉ शशिकांत वाणी,निखिल तुरखीया,संजय माळी,गौरव वाणी, पंकज राणे , प्रा, विलास डामरे, हेमलाल माळी अजय परदेशी,राजेंद्र राजपूत,जगदिश परदेशी योगेश चोधरी, रईस अली अब्बास अली अशपाक मलक,,हितेंद्र क्षत्रिय, योगेश मराठे,संदीप परदेशी, इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी साठी समाज अध्यक्ष जावेदखान हसनखान पिंजारी,उपाध्यक्ष साबीर,सहसचिव सादिक पिंजारी, बबलू पिंजारी,खजिनदार नासिर पिंजारी, कालू मंसुरी आदींनी परिश्रम घेतले.