सर्व समाज आणि शेतकरी हार्दिक पटेलच्या पाठीशी-केजरीवाल

0

नवी दिल्ली-गुजरातमधील पटेल आंदोलनकर्ते हार्दिक पटेल यांनी गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला भाजप विरोधी पक्षांनी व नेत्यांनी पाठींबा दिला आहे. दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील पटेल यांच्या उपोषणाला पाठींबा देत सर्व समाज व शेतकरी वर्ग पाठीशी असल्याची ग्वाही दिली आहे. केजरीवाल यांनी ट्विटरवरून पटेल यांना पाठींबा जाहीर केला आहे.