सर्व सहकारी बँक रविवारी सुरु राहणार

0

जळगाव। शासनातर्फे नुकतीच कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. शासनातर्फे कर्जमाफीनंतर तात्काळ दहा हजाराची मदत कर्ज स्वरुपात वितरीत करण्याचे आदेश जिल्हा बँकेला देण्यात आले आहे.

त्यापार्श्‍वभूमिवर जिल्ह्याभरातील कर्जमाफीस पात्र शेतकरी व पन्नास टक्के आणेवारी असलेल्या गावातील शेतकर्‍यांची यादी सहकार क्षेत्रातील सर्व बँकामार्फत करण्यात येणार असल्याने रविवारी सर्व बँका सुरु राहणार आहे अशी माहिती जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांनी दिली.