जळगाव: जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशीही कोरोनाने द्विशतक गाठले आहे. आज नव्याने २०७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ५ हजार १० झाली आहे. जळगावात बुधवारी सर्वाधिक ३९ कोरोनाबाधीत रुग्ण हे अमळनेर शहरात आढळून आले आहेत. दिवसभरात ८ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
आज नव्याने २०७ रूग्णांची त्यात भर पडली आहे. यात जळगाव शहर २२ , जळगाव ग्रामीण ७, भुसावळ ८, अमळनेर ३९, चोपडा १८, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव २३, यावल ३, एरंडोल १८, जामनेर १, रावेर ३०, पारोळा १, चाळीसगाव ३, मुक्ताईनगर १६, बोदवड ६ व अन्य जिल्ह्यातील १ याप्रमाणे रुग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे दिवसभरात ८ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहरातील २, रावेर, जळगाव ग्रामीण, भुसावळ, धरणगाव, भडगाव व मुक्ताईनगर तालुक्यातील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.