सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे लोणावळात पर्यटकांची गर्दी

0

लोणावळा :- सलग दोन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. पावसाळा सुरु झाला कि प्रत्येक वीकेंडला पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही नेहमीच वाढती असते. त्यामुळे राजमाची पॉईंट, अमृतांजन पॉईंट, भुशी धरण तसेच लायन्स आणि टायगर्स पॉईंट ही पर्यटन स्थळे पर्यटकांनी फुलून गेली आहे.

पावसाळा सुरु झाला की, लोणावळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे. लोणावळा शहरात पावसाने अद्यापी जोर धरला नसला तरीही मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे आता सर्वत्र हिरवळ पसरली आहे. त्याचमुळे डोंगर रांगा ही हिरव्यागार झाले असल्यामुळे हे निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठीचे तसेच भुशी धरण अद्यपी भरले नसले तरीही त्याठिकाणाबाबत पर्यटकांमध्ये असलेले आकर्षण जाणवत आहे.