सलग सुट्यांमुळे माथेरानला पर्यटकांची पहिली पसंती; सर्व हॉटेल्स झाली फुल

0

माथेरान । सलग सुट्ट्यांच्या आलेल्या या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात नवीन वर्षाच्या आगमना पर्यंत सर्वच हॉटेल्स आणि लॉजिंग हाऊसफुल दिसत आहेत. पर्यटकांनी जवळचे पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानला सर्वाधिक पसंती दर्शवली असल्याचे एकंदरीतच शनिवारी झालेल्या गर्दीमुळे स्पष्टपणे दिसत आहे. सुट्ट्यांच्या या विकेंड करीता पर्यटकांनी आपला मोर्चा माथेरानच्या दिशेने वळविलेला आहे. जवळपास साठ हॉटेल्स आणि पाचशेपेक्षा अधिक घरगुती लॉजिँगच्या खोल्या सुद्धा प्रसंगी अपुर्‍या पडत असतात. अशावेळी नेहमी येणार्‍या पर्यटकांनी अगोदरच हॉटेल्स आणि लॉजिंगचे आरक्षण केलेली आहेत. पॉईंटस् वरील छोट्या छोट्या स्टॉल्स् धारकांनी सुद्धा आपापल्या स्टॉल्स्वर सुशोभिकरण करून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. गावातील मुख्य हॉटेल्समध्ये रंगीबेरंगी विद्युत रोशनाई केलेली दिसत आहे. हा व्यावसायिक दृष्ट्या शेवटचा विकेंड असल्याने वर्ष अखेरी पर्यंत अर्थातच 31 डिसेंबर पर्यंत पर्यटक माथेरानच्या निसर्गसौंदर्याची लयलूट करणार आहेत. त्यामुळे सध्यातरी माथेरान हाऊसफुल दिसत आहे. पर्यटक हे घोडा आणि हातरिक्षातून पॉईंटस् ची मजा घेण्यासाठी जात असून बहुतांश पर्यटक हे इथल्या तांबड्या मातीवरुन पायी प्रवासाचा मनसोक्त आनंद ऊपभोगतानाही दिसत आहेत.

सर्वांनाच उत्तम रोजगार
या सुट्ट्यांच्या हंगामात लहानमोठ्या स्टॉल्स् धारकांसह रेस्टॉरंट, दुकानदार तसेच मोलमजुरी करणार्‍या श्रमिक अशा सर्वानाच उत्तम रोजगार पर्यटकांच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. इथली सुप्रसिद्ध चिक्की आणि चपला, लेदरच्या बॅग तसेच चामड्याच्या आकर्षक वस्तु खरेदीसाठी सायंकाळी पर्यटकांची बाजारपेठेत गर्दी पहावयास मिळत आहे.

या सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असते. विशेषतः दस्तुरी नाक्यावर वाहनांची गर्दी होऊ नये यासाठी आम्ही अधिकाधिक मोटार गाड्या पार्क होऊ शकतील यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पर्यटकांना काहीही अडचण भासल्यास ते माहिती केंद्रावरून इत्यंभुत माहिती घेऊ शकतात. नववर्षासाठी नगरपालिकेच्या माध्यमांतून सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे.
– प्रसाद विश्‍वनाथ सावंत,
गटनेता, माथेरान नगरपालिका

माथेरानमध्ये नियमित येणार्‍या पर्यटकांना हे स्थळ अत्यंत प्रिय असून इथले निसर्गसौंदर्य त्यांना नेहमीच खुणावत असते. काहीअंशी पर्यटकांना वाहतुकीची गैरसोय होत असते. परंतु आगामी काळात वाहतुकीची समस्या मार्गी लागणार आहे. त्यामुळे पुढील पर्यटन व्यवसाय अधिकाधिक बहरणार आहे. जसजशी विकासाची पाऊले पुढे सरसावतील त्याप्रमाणे सर्वांच्या व्यवसायात आर्थिक भर निश्‍चितपणे पडणार आहे.
– शिवाजी शांताराम शिंदे,
विरोधी पक्षनेत