सलग सुट्यांमुळे रेल्वेच्या कोकण विशेष गाड्या

0

मुंबई : रविवारला लागून आलेल्या गोपाळकाला आणि स्वातंत्र्यदिन या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची कोकण रेल्वेवर गर्दी होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे विशेष गाड्या चालविणार आहे. 01043 ही विशेष गाडी 11 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनल्सहून रात्री 1 वाजून सुटून त्यादिवशी सकाळी 11 वाजता करमाळीला पोहोचेल तर 01044 ही विशेष गाडी करमाळी येथून दुपारी 1 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 12 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे पोहोचेल.

आरक्षणासाठी गर्दी
या आठवड्यात दुसरा शनिवार, रविवार आणि सोमवार वगळून पुन्हा 15 ऑगस्ट अशा सुट्या आल्याने लोकांनी कोकणात जाण्यासाठी बेत आखले असून त्यासाठी एसटी आणि रेल्वेच्या आरक्षण खिडक्यांमध्ये गर्दी वाढलेली आहे. रेल्वेनेही विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.