सलमानचे चाहते निराशा; ‘दबंग 3’ची स्टोरी लीक !

0

नवी दिल्ली: बॉलीवूडचे दबंग खान अर्थात सलमान खानचा आगामी चित्रपट ‘दबंग 3’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट पाहत आहे. या चित्रपटाची शूटींग सुरु झाली आहे. यात सलमान, सोनाक्षी सिन्हा, अरबाज खान, प्रभुदेवा हे यासाठी परिश्रम घेत आहे. दरम्यान सलमान खानच्या चाहत्यांसाठी थोडीसी निराशाजनक बातमी आहे. अद्याप ‘दबंग 3’चे शूटींग सुरु असतांनाच या चित्रपटाची कथा लीक झाली आहे.

डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात सलमान खान शेतकºयांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात लढताना दिसेल. काही दिवसांपूर्वी बळजबरीने गरीब शेतकºयांच्या जमिनी लाटणाºया भू-माफियांबद्दलच्या बातम्या चर्चेत होत्या. सलमानचा ‘दबंग 3’ ही कहाणी पडद्यावर दाखवणार आहे. राजकीय शह मिळालेल्या भू माफियांविरोधात लढून चुलबुल पांडे गरीब शेतक-यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देईल. ही कथा मजेदार दिसत आहे आणि सलमान या कथेला पूर्णपणे न्याय देईल, असा चाहत्यांना विश्वास आहे. अर्थात ही कहाणी लीक न होता थेट पडद्यावर पाहायला मिळाली असती तर त्याची मजा काही वेगळीच असती.

‘दबंग 3’ प्रभु देवा दिग्दर्शित करत आहे. यापूर्वी सलमान व प्रभु देवा या जोडीने ‘वॉन्टेड’ या चित्रपटात सोबत काम केले होते. आता १० वर्षांनंतर पुन्हा ही जोडी ‘दबंग 3’ हा चित्रपट घेऊन येतेय. साऊथ अभिनेता सुदीप यात खलनायक साकारताना दिसणार आहे. ‘दबंग 3’ या चित्रपटात सलमानच्या अपोझिट पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाची वर्णी लागली आहे. सोनाक्षीसोबतच महेश मांजरेकरची मुलगी अश्वनी मांजरेकर ही सुद्धा यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.