नवी दिल्ली-अली अब्बास जफर यांनी बॉलिवुड चित्रपटात पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर प्रियांका चोप्राला आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दक्षिण कोरियन चित्रपट ‘ऑड टू माय फादर’चा अधिकृत रीमेक ‘भारत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला पुढील वर्षी २०१९ च्या ईदला येणार आहे. या सलमान खान सोबत भूमिका करण्यास प्रियांका तयार आहे.
सलमान खानला चित्रपटात पाच भिन्न रोल देण्यात आलेले आहे. प्रियांका देखील या चित्रपटात २८ ते ६० वयोगटातील पाच वेगवेगळ्या भूमिका करणार आहे. ‘भारत’ एक सुंदर प्रेमकथा असलेला चित्रपट आहे. ‘भारत’ मध्ये तब्बू आणि दिशा पाटणी यांनाही रोल मिळणार आहे.