नवी दिल्ली – कुख्यात गुंड संपत नेहराच्या रडारवर असलेल्या अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याचा कट हरयाणा पोलिसांनी उधळून लावला. हरयाणा पोलिसांनी संपतला अटक केली. नेहरा हा भयावह लॉरेन्स बिश्णोईच्या देशांतर्गत टोळीचा सदस्य आहे. काळवीट प्रकरणी खटला सुरू असलेल्या सलमानला मारण्यासाठी संपत नेहरा सातत्याने सलमानच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता.
२८ वर्षीय नेहरा हा चंडीगड पोलीस खात्यातील निवृत्त सहायक उपनिरीक्षकाचा मुलगा आहे. तो राष्ट्रीय स्तारावरील डिकॅथलॉन अॅथलीट आहे. नेहराच्या नावे डझनावर खून, खंडणी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. नेहराच्या हिट लिस्टमध्ये सलमान व्यतिरिक्त विरोधी गॅंगसह सहा जणांचा समावेश होता.