मुंबई: बॉलीवूडचा भाईजान सलमान खान काही दिवसांपासून ‘भारत’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी ‘माल्टा’ येथे गेला आहे. सलमानचा फिटनेस व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांचे ‘हम फिट तो इंडिया फिट’ हे आव्हान स्वीकारत त्याने हा फिटनेस व्हिडिओ त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
सलमानच्या या व्हिडिओने सर्वांवर मात केली आहे. या व्हिडिओत तो सायकलींग करताना दिसत आहे. ही एक उत्कृष्ट मोहीम असल्याचेही त्याने ट्विटरवर म्हटले आहे. मे महिन्यात हे फिटनेसचे ऑनलाईन आव्हान देण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय क्रिकेटर विराट कोहली, अभिनेता हृतिक रोशन यांनीदेखील हे आव्हान स्वीकारत सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केले होते