सलमान बद्दलचा ट्विट जावेद जाफरीला पडला महागात

0

मुंबई: सध्या केरळमधील पूरग्रस्तांची परिस्थिती फारच दुर्दैवी सुरु असल्याने देशातील बऱ्याच जणांनी मदतीचा हात पुढे केला आहे. यात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिंटीजचे नावही समावेश आहेत. अशातच जावेद जाफरीने सलमान खानबद्दल एक चुकीचे ट्विट केले आहे.

केरळला ज्यांनी कोणी मदत केली आहे, त्या सर्वांचे आभार केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी मानले आहेत. पण, या यादीत सलमान खानचे नाव कुठेही नाही. त्यामुळे जावेदला या ट्विटमुळे ट्रोल होण्याची वेळ आली आहे. ही चूक कळताच त्याने हे ट्विट डिलीट केले. मात्र, याविषयीचा खुलासा त्याला पुन्हा एक ट्विट करुन द्यावा लागला.

सलमानच्या केरळ मदतीबद्दल मी ऐकले होते आणि त्याचे याआधीचे कार्य बघता, मला ते खरे वाटले. पण, जोपर्यंत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी माझे ट्विट मागे घेतोय, असा खुलासा त्याने केला.