सवर्णांना शिक्षणातील आरक्षणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून – प्रकाश जावडेकर

0

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षणातील १० टक्के आरक्षणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाईल, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

केंद्राने सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांना सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण येत्या शैक्षणिक वर्षांपासून लागू करण्याचे आदेश दिले आहेत, असे जावडेकर यांनी सांगितले. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना शिक्षण आणि नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने नुकताच घेतला होता. त्यासाठी वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. हे आरक्षण देण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित करण्यात आले आहे. निवडणुका जवळ असताना घेतलेला हा निर्णय म्हणजे दुरावलेल्या सवर्णांना आपल्याकडे वळवण्याची भाजपची खेळी असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.