महिलांच्या निवेदनाची पोलीस निरीक्षकांकडून दखल
नवापूर- तालुक्यातील जुनी सावरट येथे दारुबंदी व जुगार बंद करण्याच्या मागणीसंदर्भात उमेद अभियानातील सर्व स्वयम सहायता समुहचा 123 महिल्यांनी नवापूर पोलिस स्टेशन येथे पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले होते. त्याची दखल घेत पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आज सायंकाळी गावातील दारूभट्टीवर कारवाई करून दोघांना अटक केली आहे. यात 4 हजाराची दारू जप्त करण्यात आली आहे.
4 हजारांची दारू जप्त
पोलीस उपनिरीक्षक संदिप पाटील यांनी दोन दारुचा हातभटीवर कारवाई केली. यात 2 हजार किमतीचे 2 प्लास्टीक ड्रम यात 50,50 लिटरचे ग्रा.ह.ब.दारु पकडली यात काशिराम पोसल्या गावीत (वय 55, रा जुनी सावरट) नितेश यशवंत गावीत (वय 19 रा जुनी सावरट) यांना अटक करण्यात आली आहे. नितेश गावीत यांचा कडुन ही 50,50,लिटरचा ग्रा.ह.ब.दारु पकडण्यात आली आहे. दोघे मिळुन 4 हजार रुपयाची दारुचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे ही कारवाई उपनिरीक्षक संदिप पाटील,अ.स.ई.विजय गवळे,पो.हे.का गुमानसिंग पाडवी, पो.का साहेबराव जाधव, हिरालाल सोनवणे, प्रशांत यादव,कविता पाटील यांनी ही कारवाई केली आहे. ही कारवाई होताच सावरट गावातील महिल्यांनी समाधान व्यक्त केले आहे.