जळगाव । जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत सत्ताधारी सहकार गटाच्या गटनेतेपदी पुन्हा उदय पाटील यांची निवड करण्यात आली तर प्रतोदपदी सुनील निंबा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार गटाचे नेते बी. बी. पाटील यांनी ही निवड केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष तुकाराम बोरोले, उपाध्यक्ष महेश पाटील, तसेच संचालक उपस्थित होते.